
हिंगोली- येथील शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन वर्षानिमित्त व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक पूर्व शिक्षणाधिकारी मा. शिवाजीराव पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शिवाजीराव पवार यांचा सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. किशोर इंगोले म्हणाले की, समाजाचे उत्तरदायित्व म्हणून आपण सर्वांनी नियमित रक्तदान केले पाहिजे. रक्ताच्या पिशवीला ठराविक मुद्दत असते रक्ताचा तुटवडा असो किंवा नसो असाध्य रोगावर किंवा ठराविक व्याधींसाठी ताजे रक्त व पेशी आवश्यक असतात. हंगामी विषाणूजन्य आजार, चक्रीवादळासारख्या हवामान चलित आपत्ती, वातावरणातील बदल, आजारांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे रक्ताचा तुटवडा दूर करता येतो. यावेळी 27 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या विचारमंचवर मा. शिवाजीराव पवार, संस्थेच्या अध्यक्षा सौ. मंदाताई पवार, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. प्रल्हाद शिंदे, संस्थेचे सहसचिव श्री प्रणव पवार, संस्थेचे सदस्य श्री प्रभाकर पारीसकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब क्षीरसागर, रक्त संकलन अधिकारी डॉ. स्वाती गुंडेवार, श्री सी जे लोंढे, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. सुनील कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. आशिष इंगळे मुख्याध्यापक श्री रतन भोपाळे, प्रा. देवानंद येवले, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या अधीक्षक श्रीमती प्रतिभा पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धाराशिव शिराळे तर आभार प्रदर्शन प्रा. संजय चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षकवृंद, प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.