जयंत पाटील : “लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जातोय का?”

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

येत्या 22 जानेवारीला आयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. मात्र दुसरीकडे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राजकीय नेत्यांमध्ये टिकास्त्र केले जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या हस्ते सांगलीमधील इस्लामपुरात श्रीराम मंदिरात कलश पूजन सोहळा पार पडला. 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणार्‍या प्रभू श्रीरामांच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त कलश पूजनाचे आयोजन करण्यात आले.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर श्रीराम मंदिरात जयंत पाटील यांच्या शुभहस्ते कलश पुजनाचा सोहळा पार पडला.

यादरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी “रामनवमीच्या दिवशी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा झाली असती तर हा सोहळा आणखी रंगतदार झाला असता, पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात आहे का?

अयोध्येतील राम मंदिर न्यासाने उभे केले आहे. देशातील सर्वांनी यासाठी देणगी दिली आहे, त्यामुळे कोणा एकाची त्यावर मालकी असू शकत नाही. मंदिर उभारले जात आहे त्याला जास्त महत्व आहे,” असा टोला पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

यावेळी जयंत पाटील यांनी अयोध्येत कधी जाणार असल्याचेही सांगितले. “मी अयोध्येत दर्शनासाठी आता जाणार नाही, कारण तिथे जास्त गर्दी असणार आहे. गर्दी कमी असेल तेव्हा मी नक्की जाणार आहे,” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

“देशातील भाविक रामासाठी एकत्र आला आहे. मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लोक आप आपल्या कामाला लागतील. याचा राजकीय फायदा कोणाला होईल असं मला वाटत नाही, कारण सगळ्यांची राजकीय भूमिका वेगळी आहे,” असंही जयंत पाटील म्हणाले.

Leave a Comment