जयंत पाटील : सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी कोरडी, उपसा सिंचन योजना बंद

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (दि. 14) कोयना धरणाच्या पाण्याचा मुद्दा सभागृहात लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. यावेळी सांगली जिल्ह्य़ातील भीषण पाणीटंचाईवर सभागृहाचे लक्ष वेधत असताना कोयना धरणाचे पाणी लवकरात लवकर कृष्णा नदीत सोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, कोयनेतून पाणी कमी आल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे ताकारी आणि अन्य उपसा सिंचन योजनेचे पंप बंद करण्यात आले आहेत.

जिल्ह्याचे हक्काचे ३२ टीएमसी पाणी उपलब्ध करून देणे व कृष्णा नदी कोरडी न पडू देणे याची काळजी शासनाने घेतली पाहिजे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विविध विधाने करत आहेत.

खासदार महोदयांनी तर राजीनामा देतो असे विधान केले. या विविध विधानांमुळे, राजकीय दबावामुळे पाणी सोडले जात नाही असा समज झाला.

सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पालकमंत्र्यांचे समन्वय नाही किंवा संवाद नाही असे दिसून आले आहे असे म्हणत त्यांनी कोयना धरणाच्या पाण्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर टोला लगावला.

Leave a Comment