लोकसभा घुसखोरी प्रकरणी मोठी कारवाई ; लोकसभा सचिवालयाचे ८ कर्मचारी निलंबित

Photo of author

By Sandhya

लोकसभा सचिवालयाचे ८ कर्मचारी निलंबित

संसदेच्या सुरक्षेत कुचराई केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयातील ८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. बुधवारीच लोकसभा अध्यक्षांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

सर्वपक्षीय बैठकीतही या विषयावर चर्चा झाली, ज्यामध्ये विविध पक्षांनी ही गंभीर बाब असल्याचे वर्णन केले. लोकसभेच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावरून विरोधक आज केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

गुरुवारीही सभागृहाचे कामकाज सुरू होताच संसदेत या मुद्द्यावरून गदारोळ झाला. प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये अरविंद, रामपाल, अनिल, गणेश, प्रदीप, नरेंद्र आणि विमित या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यांच्या सह आणखी एका कर्मचाऱ्याचा निलंबनाच्या कारवाईत समावेश आहेत.

दरम्यान, आज लोकसभेचे कामकाज सुरु होताच विरोधकांनी संसदेतील या गोंधळावरून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.  त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेच्या सुरक्षेची जबाबदारी ही सचिवालयाची असते यात केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकत नाही असे म्हटले.

तर केंद्राचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सभागृहातील सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. बुधवारी लोकसभेच्या कामकाजादरम्यान प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेल्या दोन व्यक्तींनी खासदारांमध्ये उड्या मारल्या.

त्याने पायातुन धुराचे डबे काढले आणि घरातील धूर काढला. यानंतर खासदार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. सागर शर्मा आणि मनोरंजन अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment