जेजुरीत सोमवतीयात्रे निमित्त भाविकांची गर्दी ; दोन लाख भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन

Photo of author

By Sandhya

जेजुरीत सोमवतीयात्रे निमित्त भाविकांची गर्दी              दोन  लाख भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन

जेजुरी दिनांक १३ (सोमवती यात्रे निमित्त अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या खंडेरायाच्या दर्शनासाठी आणि क-हा स्नान,कुलधर्म-कुलाचारासाठी ऐतिहासिक जेजुरी नगरीत दोन लाखांहून अधिक भाविकांची गर्दी झाली होती.

यावेळी खंडेरायाच्या पालखी सोहळ्यावेळी मंदिर गडकोटांसह -कहानदीतीरी भंडाराची उधळण करीत, सदानंदाचा येळकोट…येळकोट -येळकोट जयमल्हार असा जयघोष केला.

सोमवती यात्रेच्या निमित्ताने रविवार पासूनच शहरात कोकण बांधवांसह राज्यातील विविध ठिकाणावरून आलेल्या भाविकांनि कुलधर्म-कुलाचार व देवदर्शनासाठी गर्दी होती.

सकाळी सात वाजता देवाचे मानकरी पेशवे इनामदार तसेच खोमणे, माळवदकर यांनी इशारा करताच पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.यावेळी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या फेरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली.

पालखी समोर निशाण,छत्रचामरे अब्दागिरी तसेच घडशीसमाज बांधवांच्या वतीने सोहळ्यापुढे सनईचे मंगलमय सूर निनादत होते.मंदिर प्रदक्षिणेनंतर भंडारगृहातील श्री खंडोबा व म्हाळसा देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली व पालखी सोहळा गडावरून निघताच हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष करीत खंडोबा देवाचे लेण असणारा पिवळ्या जर्द भांडाराची उधळण केली.

संपूर्ण गड परिसर भंडाराने न्हाऊन निघाला देवा तुझी सोन्याची जेजुरीचा प्रत्येय भाविकांनी यावेळी अनुभवला.यावेळी देवसंस्थान विश्वस्तांसह – समस्त पुजारी, सेवेकरी,खांदेकरी,मानकरी सहभागी झाले होते.

दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळा कऱ्हा नदीवरील रंभाईशिंपीन कट्ट्यावर (पापनाशतीर्थ ) स्थिरावला . कऱ्हा नदीवर मानकरी व भाविकांनी उत्सवमूर्तींना विधिवत क-हास्नान घालण्यात आले.

यावेळी समस्त पुजारी,सेवेकरी.मानकरी.खांदेकरी यांचेसह भाविकांनी क-हास्नानाची पर्वणी लुटली. देव अंघोळी नंतर समाज आरती झाली . पालखीसोहळा परतीच्या मार्गावर धालेवाडीकरांनी व दवणेमळा मार्गे पालखी सोहळा जानाई मंदिरात पोहचला .

Leave a Comment