खासदार सुप्रिया सुळे : देशात, राज्यात दडपशाहीचे सरकार

Photo of author

By Sandhya

खासदार सुप्रिया सुळे

सध्या देशात आणि राज्यात दडपशिहिचे सरकार असून या सरकारमुळे महागाईचा भडका उडालेला आहे. भुलभुलय्या करून जनतेची फसवणूक करणार्‍या दोन्ही सरकारला पुढील काळात येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये गोरगरीब जनता धडा शिकवणार असल्याने केंद्रात इंडिया तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

भोर येथ खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून अंगणवाडी व आशा भगिनी कार्यसन्मान सोहळा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला जिल्हाध्यक्षा भारती शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शलाका कोंडे, तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल,

तालुका कार्याध्यक्ष संदीप नांगरे, शहराध्यक्ष यशवंत डाळ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, गणेश तुपे, महिला तालुकाध्यक्ष विद्या यादव, वंदना धुमाळ, हसीना शेख, गणेश खुटवड आदींसह शेकडो महिला, कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या की, आम्ही महाराष्ट्राची संस्कृती सत्तेसाठी सोडणार नाही.

सत्ता ही तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी असते. पुढील काळात राज्यात येणार्‍या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करणार असून अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा सेविकांचे पगार वाढ करण्याकडे प्रामुख्याने लक्ष देणार आहे.

यावेळी आशा सेविका, अंंगणवाडी सेविकाःचा भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला तर लकी ड्रॉ मधील विजेत्या महिलांना पैठणी तर तीन विजयी आशा सेविका, अंगणवाडी महिलांना ईलेक्ट्रिकल स्कूटर देवून गौरवण्यात आले.

Leave a Comment