ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट…

Photo of author

By Sandhya

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी मोठी अपडेट!

ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा मोठी कारवाई केली असून पुणे पोलिसांनी ससून मधील अजून एकाला अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून गेल्यानंतर पोलीस दलावर जोरदार टीका झाली होती, तसेच रुग्णालय प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.

ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेवते हा कारागृहातून ससून रुग्णालयात आणलेल्या कैद्यांची बडदास्त करत होता.

शिवतेला अटक केल्याने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाल्याचे पाहयाला मिळत आहे. ललित पाटील ससून रुग्णालयात असताना ललित पाटीलची सगळी कामे शेवते बघत असल्याची माहिती समोर आली आहे.

Leave a Comment