लवकरच महाराष्ट्रात सत्तांतर घडू शकतं ?

Photo of author

By Sandhya

लवकरच महाराष्ट्रात सत्तांतर घडू शकतं ?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या, मात्र ‘आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत, येथेच राहणार आहे. शरद पवारांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी वाढीसाठी काम करत राहणार.

जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार आहे. असे म्हणत या सर्व चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  यावरून आता राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

अशात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ‘आमच्या सोबत बरेच आमदार आहे. कोणतंही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज आहे.

आणि तिथी लवकरच येणार आहे. असं म्हणत ते पुढे म्हणाले, अजून तरी कूळ बघावे लागेल, गुण जुळावे लागतील त्यानंतर ते काम करावे लागेल, असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं होत.

आता पुन्हा एकदा त्यांनी माध्यमांशी बोलतांना सूचक विधान केलं आहे ते म्हणाले,’अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली असली तरी लवकरच महाराष्ट्रात सत्तांतर घडू शकतं, ही वेळही लवकरच येईल. दोघांची इच्छा आहे.

पण गुण जुळत नसल्याचं ब्राह्मणाचं म्हणणं आहे, अशी मिश्किल टिप्पणीही गुलाबराव पाटलांनी केली. “याला अजून किती दिवस लागतील, हे ब्राह्मणाला विचारावं लागेल. कारण वरचा ब्राह्मण फार कठीण आहे.. अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय महाभूकंपाबाबत पाटील म्हणाले आहे.

Leave a Comment