पुण्यात मिशन होर्डिंग्ज सुरु; 21 होर्डिंग्ज जमीनदोस्त

Photo of author

By Sandhya

पुण्यात मिशन होर्डिंग्ज सुरु; 21 होर्डिंग्ज जमीनदोस्त

शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर अखेर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून बुधवारी दिवसभरात 21 अनधिकृत होर्डीग्ज काढण्यात आले.

या कारवाईसाठी महापालिकेने स्वतंत्र पथके नेमली असून ही कारवाई या पुढेही कायम ठेवली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे प्रमुख उपायुक्‍त माधव जगताप यांनी दिली.

शहरात सुमारे 1600 अनधिकृत होर्डिंग्ज असून प्रामुख्याने ती नव्याने समाविष्ट गावांमध्ये आहेत. या गावातील होर्डिंग्जला अधिकृत करण्यासाठी अभय योजना प्रस्तावित आहे. मात्र, त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच अनेक होर्डिंग्जचे मालकच सापडत नसल्याने असे होर्डिंग्ज काढण्यासाठी पालिका सरसावली आहे. बुधवारपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Leave a Comment