महगाईचा झटका..! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ

Photo of author

By Sandhya

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महगाईचा झटका बसला आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी रविवारी कमर्शिअल एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 209 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

त्यामुळे आता 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1731.50 रुपयांना विकला जात आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून ही दरवाढ लागू झाली आहे. सप्टेंबरमध्ये कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या.

मागील महिन्यात 157 रुपयांनी स्वस्त करण्यात आलेले सिलिंडरचे दर आता त्याच्यापेक्षाही जास्त किंमतीत वाढवण्यात आले आहेत. कमर्शिअल सिलेंडरची किंमत 1522 रुपयांवरून वाढून 1731.50 रुपये झाला आहे.

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत वाढली असली तरी घरगुती एलपीजीच्या दरात कोणताही वाढ करण्यात आलेली नाही.

ऑगस्ट महिन्यांत सरकारने सामान्य लोकांना महागाईपासून दिलासा देत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपये कमी करण्यात आला होता.

ज्यानंतर राजधानी दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपयांवरून कमी होऊन 903 रुपये झाली आहे. त्यामुळे आता 1 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

जुन्या दरानेच घरगुती गॅस सिलिंडर सर्व सामान्यांना मिळणार आहे. इतर शहरातील व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती

1) कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 203.50 रुपयांनी वाढून 1,839.50 रुपये इतकी झाली आहे.

2) मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 1,684 रुपये झाली आहे.

3) चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 203 रुपयांनी वाढली असून येथे 1898 रुपयांना सिलिंडर घेता येणार आहे.

4) दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1731.50 रुपयांना विकला जाणार आहे.

Leave a Comment