महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रातील ‘हे’ प्रसिद्ध मंदिर आठ दिवस राहणार बंद…

Photo of author

By Sandhya

महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रातील 'हे' प्रसिद्ध मंदिर आठ दिवस राहणार बंद

मांढरदेव (ता. वाई) येथील काळेश्वरी देवीच्या मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून (गुरुवार) २८ सप्टेंबरअखेर बंद ठेवल्याची माहिती मांढरदेव देवस्थानच्या वतीने देण्यात आली.

मात्र, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी काळेश्वरी देवीच्या उत्सव मूर्तीचे दर्शन सभा मंडपात सुरू ठेवले जाणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष, सत्र जिल्हा न्यायाधीश यांनी कळविले आहे.

सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थानच्या वतीने केले आहे. मांढरदेव येथील काळेश्वरी किंवा काळूबाई देवीचे मंदिर महाराष्ट्रातीलच नव्हे तर अनेक राज्यांतील भाविकांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दरवर्षी उत्सव काळातच नव्हे तर दररोज देखील भाविक दर्शनसाठी गर्दी करतात.

मात्र, देवीच्या मुख्य गाभाऱ्यात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, त्यामुळे या काळात भाविकांची थोडी गैरसोय होणार आहे. हे मंदिर 21 ते 28 सप्टेंबर या काळात दर्शनासाठी बंद राहणार आहे. या दिवसांत भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Leave a Comment