महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी दुचाकीवरून हिसकावली

Photo of author

By Sandhya

महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी दुचाकीवरून हिसकावली

दुचाकीवरून पतीसोबत निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील 22 हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावली. ही घटना 12 एप्रिल रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास लोहगाव वाघोली रस्त्यावर घडली.

या प्रकरणी कर्मभुमी नगर लोहगाव येथील 38 वर्षीय महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन चोरट्यांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ह्या त्यांच्या पतीसोबत पाठीमागे बसून दुचाकीवरून निघाल्या होत्या.

त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला.

Leave a Comment