माजी खासदार संभाजीराजे : युद्धपातळीवर आयोग नेमून मराठ्यांचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करावे

Photo of author

By Sandhya

युद्धपातळीवर आयोग नेमून मराठ्यांचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करणे

मराठा समाजाची भावना आणि नेमकी तांत्रिक बाब, यामध्ये समन्वय साधणे गरजेचे आहे. युद्धपातळीवर आयोग नेमून मराठ्यांचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करणे याकडेच सरकारने लक्ष द्यावे;

पण हा मुद्दा सोडून सर्व नेतेमंडळी आपापल्या पद्धतीने आंदोलनावर बोलत आहेत, अशी खंत माजी खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

मंगळवारी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, सामाजिक मागासलेपण सिद्ध झाल्याखेरीज मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही.

त्यामुळे आयोग नेमून मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण समोर आणावे लागेल. हा तांत्रिक; परंतु अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याने यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन युद्धपातळीवर हालचाली कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.

ते म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील दरवर्षी आंदोलन करतात. यावर्षी आंदोलनामध्ये काय घडले, हे सर्वज्ञात आहे. त्यांच्या मागण्यांबाबत मराठा समाजाची जी भूमिका असेल, तीच भूमिका आपलीही असेल.

Leave a Comment