मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेणार? रात्री उशिरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली

Photo of author

By Sandhya

रात्री उशिरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलच तापलं आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचारामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

अशातच काल जालन्यातील आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. तरीही तोडगा निघाला नाही.

राज्याभरातील नेत्यांनी जरांगे यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर राजकीय नेते, आंदोलक, राज्यभरात पाळले जाणारे बंद यामुळे सरकार कोंडीत अडकले आहे.

या सर्व घडामोडी घडत असतानाच रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीत मंत्रिमंडळ बैठक, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान मराठा आरक्षणावर तिढा आज तरी सुटणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

त्याचबरोबर आरक्षणावर तोडगा न निघाल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. आजही राज्यभरात आजही मराठा आरक्षणाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये झालेल्या या बैठकीत कोणता ठोस निर्णय घेण्यात आला का याकडेही राज्याच लक्ष लागलं आहे. यासंदर्भातील वृत्त ‘साम टिव्ही’ने दिले आहे.

Leave a Comment