मल्लिकार्जुन खरगे : “4 जूनला मोदींची पाठवणी होणार अन् I.N.D.I.A. ‘सरकार येणार”

Photo of author

By Sandhya

मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरेगें यांनी,”लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांनंतर इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना निरोप देण्याचा निर्णय घेतलाय”असे म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला. इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करणार आहे.

उत्तर प्रदेशच्या राजधानीत म्हणजे लखनऊमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत खरेगेंनी हा दावा केला. इंडियाआघाडी सरकार स्थापन करण्याचा दावा करताना मल्लिकार्जुन खरगे यांनी,”निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत.

“इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. जनतेने पंतप्रधान मोदींना निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशातील वातावरण पाहता आम्ही असे म्हणू शकतो की “इंडिया आघाडी 4 जून रोजी नवीन सरकार स्थापन करत आहे.”

तसेच, “2024 ची निवडणूक ही सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. ही विचारधारेची निवडणूक आहे. एकीकडे गरिबांच्या बाजूने लढणारे पक्ष एकदिलाने लढत आहेत.

दुसरीकडे, जे श्रीमंतांसोबत राहून अंधश्रद्धेसाठी लढत आहेत आणि लोक त्यांना योग्य वाटतात म्हणून धर्माच्या आधारावर लढत आहेत.” असे म्हणत यांनी भाजपवर निशाणा साधला.

काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, “आमचा लढा गरिबांच्या बाजूने आहे. , केंद्र सरकार ही पोकळी भरायला तयार नाही, “इंडिया आघाडी बेरोजगारी आणि महागाईविरोधात लढत आहे.

लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वांनी काम केले पाहिजे, अन्यथा आपण गुलामगिरीत जाऊ. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे. लोकशाही नसेल तर हुकूमशाही सरकार येईल. मग तुम्ही कसे मत द्याल?”

काँग्रेस अध्यक्ष लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या आघाडीचा दावा करताना दिसले. ते म्हणाले की, इंडियाच्या आघाडी पुढे असून भाजप पिछाडीवर असल्याचे अहवाल आम्हाला मिळाले आहेत.” असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ते म्हणाले की, भाजप नेते संविधान बदलण्याची भाषा करतात, पण मोदी गप्प आहेत. अशा लोकांची पक्षातून हकालपट्टी का केली जात नाही? खरगे म्हणाले की, “मोदी आपल्या भाषणात मटण, चिकन, मंगळसूत्र या सगळ्याबद्दल बोलतात. तुम्हाला मतदान करायचे असेल तर तुमच्या कामाला मत द्या.”असे आवाहन देखील त्यांनी केले.

Leave a Comment