मंत्री एकनाथ खडसे यांना अंतरिम जामीन

Photo of author

By Sandhya

 एकनाथ खडसे यांना अंतरिम जामीन

भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांना विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.

भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात खडसे यांच्याविरुद्ध लातूर प्रतिबंधक विभागाने आरोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणात अंतरिम जामीन मिळावा म्हणून खडसे यांनी अर्ज दाखल केला होता. जामीन मिळवण्यासाठी खडसे यांनी विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर येत्या3 जानेवारीला अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

Leave a Comment