मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पायी दिंडी आंदोलन

Photo of author

By Sandhya

पायी दिंडी आंदोलना

मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी दि. १५ रोजी सकाळी पायी दिंडी आंदोलनाला प्रारंभ झाला. पैठण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरातून दिंडीला सुरुवात झाली. या पायी दिंडीचा मुक्काम बिडकीन येथे राहणार आहे.

मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पैठण ते छत्रपती संभाजीनगर ५० किलोमीटर आरक्षण पायी दिंडी आयोजित करण्यात आले.

या आरक्षण दिंडीचा शुभारंभ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरातून अनिल राऊत, आशिष गायकवाड, दीपक मोरे, साईनाथ कर्डिले, तुषार पाटील, किशोर सदावर्ते, रामेश्वर बावणे, शहादेव लोहारे, पुष्पा गव्हाणे यांच्यासह हजारो मराठा बांधवाच्या उपस्थितीत प्रस्थान करण्यात आले.

या आरक्षण दिंडीचा मुक्काम बिडकीन येथे होणार असून शनिवारी दि.१६ रोजी सकाळी संभाजीनगर येथे जाऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठा समाज बांधवांच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे.

या आरक्षण पायी दिंडी प्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नाही, यासाठी पैठण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, एमआयडीसी सपोनि निलेश खेळे, बिडकीन सपोनि गणेश सुरासे,

पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल, दिलीप चौरे, संजय मदने, गोपनीय शाखेचे मनोज वैद्य, विष्णू गायकवाड, दंडगव्हाळ, सचिन आगलावे, नरेंद्र अंधारे, करतासिंग सिंगल, राजेश चव्हाण, सुधीर ओव्हळ, चेडे, पुरी यांनी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

Leave a Comment