मराठा आरक्षणप्रश्नी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार

Photo of author

By Sandhya

मराठा आरक्षणप्रश्नी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार

मराठा आरक्षणप्रश्नी मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. याबरोबरच कोल्हापूर हद्दवाढ आणि कोल्हापूर महापालिका आयुक्त तथा प्रशासक नियुक्तीबाबतही बैठक होणार असल्याचे सकल मराठा समाजाचे अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी सांगितले.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातूनच आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाने एल्गार पुकारला आहे. 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हापूर हद्दवाढीचा प्रश्न कायम आहे.

कोल्हापूरला कोणी राजकीय वालीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिकेची एकदाही हद्दवाढ झालेली नाही. हद्दवाढीअभावी शहराची अक्षरश: घुसमट सुरू असून विकासापासून  वंचित राहण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे.

कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या शहरासाठी राज्य शासनाला अद्याप आयुक्त म्हणून एकही अधिकारी मिळत नाही. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने शहराच्या विकासावर परिणाम होत आहे.

या सर्व बाबींवर शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमनिमित्त कोल्हापुरात येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक घ्यावी, अशी लेखी मागणी सकल मराठा समाजाने केली होती.

Leave a Comment