सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकर हजारोंच्या संख्येने हजेरी लावत, मेट्रो प्रवास

Photo of author

By Sandhya

हजारोंच्या संख्येने हजेरी लावत, मेट्रो प्रवास

विकेंडला मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावत, मेट्रो प्रवास केला. कुटुंबीयांसह आलेल्या प्रवाशांमुळे मेट्रोच्या ट्रेन गर्दीने तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र रविवारी पहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच पुणे मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन झाले आहे, त्यामुळे वनाज-पुणे स्टेशन-रुबी हॉल आणि सिव्हिल कोर्ट-फुगेवाडी-पीसीएमसी असा प्रवासमार्ग सुरू झाला आहे.

त्यामुळे कोथरूडकरांना थेट पिंपरी-चिंचवडपर्यंत मेट्रोने प्रवास करता येत आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार या कामकाजाच्या दिवसांतसुध्दा मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर शनिवार, रविवारी मेट्रोला आणखीनच गर्दी होत आहे.

त्यातच मेट्रो प्रशासनाने शनिवारी, रविवारी दिलेल्या 30 टक्के सवलतीमुळे तर प्रवाशांची खूपच गर्दी वाढली आहे. रविवारी कुटुंबीयांसह येऊन अनेकांनी मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला.

या वेळी कोणी सेल्फी घेत होते, तर कोणी कुटुंबीयांसह फोटो, तर तरुणाई रील्स बनविण्यासाठी व्हिडीओ काढताना पहायला मिळाली. शाळांना सुट्टी असल्याने शालेय विद्यार्थी रविवारी दिसले नाहीत. मात्र, इतर दिवशी प्रवास केला, तर शालेय विद्यार्थीदेखील पहायला मिळतात.

Leave a Comment