मोठा अपघात टळला; बस पलटी होऊन ४६ प्रवासी जखमी

Photo of author

By Sandhya

मोठा अपघात टळला; बस पलटी होऊन ४६ प्रवासी जखमी

अंबाजोगाई बसस्थानकातून निघालेली मोरफळी बसचा मुकुंदराज दरी मार्गे जात असताना घाटामध्ये काल दुपारी दीडच्या सुमारास ब्रेक फेल झाला. चालकाने प्रसंगावधान राखून ही बस रस्त्यालगत असलेल्या झाडावर धडकली.

त्यामुळे बसमधील 53 प्रवाशांपैकी 46 प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती कळताच पोलीस, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, नायब तसीलदार गणेश सरोदे, पोलीस निरिक्षक विनोद घोळवे त्यांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेतली.

जखमींना बसमधून बाहेर काढत रूग्णालयात दाखल केले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 53 प्रवासी बचावले. अन्यथा बस दरीत कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

Leave a Comment

You cannot copy content of this page