प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कोव्हिड काळातील शेतकर्यांची नुकसानभरपाई आठ दिवसांत द्या, अन्यथा कारवाईची तयारी ठेवा, अशा शब्दांत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपन्यांना इशारा दिला आहे.
मंत्रालयात गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. मुंडे म्हणाले, काही विमा कंपन्यांकडून 2020-21 मधील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या शेतकर्यांची नुकसानभरपाई अद्याप दिली नाही.
येत्या आठवडाभरात शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत कंपन्यांनी निर्णय घ्यावा. त्यानंतर पुन्हा राज्य स्तरावर आढावा घेतला जाईल. त्यानंतर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.