‘कट, कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जंग जंग पछाडूनही काँग्रेसचा मोठा पराभव झाला,’ अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे माध्यमांशी बोलताना केली.
‘काँग्रेसच्या काळात राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. त्यात पशुखाद्य गैरव्यवहार, कॉम्प्युटर गैरव्यवहार, कोळसा गैरव्यवहार, टू-जी अशी गैरव्यवहारांची मोठी यादी आहे. त्यामुळे जनतेने २०१४ मध्ये त्यांचे तोंड काळे केले. २०१९ मध्ये देखील या पक्षाला तेच भोगावे लागले. तीच परिस्थिती २०२४ मध्ये झाली.
कट, कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पतंप्रधान झाले,’ असे शिंदे म्हणाले.
‘पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसला गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारावर बोलण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही,’ असे शिंदे म्हणाले.