मुंबईतील गॅलेक्सी हॉटेलमध्ये अग्नितांडव !

Photo of author

By Sandhya

मुंबईतील गॅलेक्सी हॉटेलमध्ये अग्नितांडव !

मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील एका पाच मजली हॉटेलला रविवारी दुपारी भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, आठ जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅलेक्सी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली.

आगीत इमारतीचे देखील मोठे नुकसान झाल्याचे समजते. प्रभात कॉलनीतील असलेल्या या गॅलेक्सी हॉटेलला लागलेल्या आगीमुळे परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण होते.अग्निशमन दलाला आगीबाबतची माहिती मिळताच आग विझण्यासाठी जवान घटनास्थळी दाखल झाले.

ही लेव्हल-वन आग आहे. सुटका करण्यात आलेल्या सर्व लोकांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या, पाण्याचे टँकर आणि इतर मदत घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Leave a Comment