पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; शुभेच्छांचा वर्षाव

Photo of author

By Sandhya

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज त्यांचा 73  वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह इतर मान्यवर आणि सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून म्हणजेच आजपासून भाजप महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत “सेवा पखवारा” लाँच करत आहे.  या योजनेचा प्रमुख उद्देश  कल्याणकारी उपक्रमांसह समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहचवणे हा आहे.

दरम्यान, परप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना राष्ट्रपती म्हणाले की, ‘अमृत काल’ दरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दूरदृष्टी आणि कणखर नेतृत्वाने भारताच्या प्रत्येक क्षेत्रात विकासाचा मार्ग मोकळा करावा अशी माझी इच्छा आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी, “पक्ष संघटना असो किंवा सरकार, आम्हाला नेहमीच राष्ट्रहिताची प्रेरणा मोदीजींकडूनच मिळते,” असे सांगून ते म्हणाले की, अशा अद्वितीय नेत्याच्या नेतृत्वाखाली देशाची सेवा करणे हे त्यांचे भाग्य समजले.

तर पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत ,”पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीची जागतिक प्रतिष्ठा, लोकांचा बहुआयामी विकास आणि देशाच्या सार्वत्रिक प्रगतीला मूर्त स्वरूप दिले आहे.

“अंत्योदय”  हे आमचे ध्येय प्रत्येक गावात आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले आहे आणि विकसित भारताच्या संकल्पाचा मंत्र बनला आहे.” असे म्हटले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मोदींनी भारताला नुसतीच नवी ओळख दिली नाही तर जगात त्याची प्रतिष्ठाही वाढवली आहे.असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “नव्या भारताचे शिल्पकार” म्हणून कौतुक केले आणि “विकसित भारत” निर्माण करण्याच्या त्यांच्या समर्पणाचे आणि दूरदृष्टीचे कौतुक केले.

“भारत मातेचे महान भक्त, ‘नव्या भारता’चे शिल्पकार, ‘विकसित भारता’चे स्वप्न पाहणाऱ्या, ‘एक भारत – सर्वोत्तम भारत’साठी कटिबद्ध, जगातील सर्वात लोकप्रिय राजकारणी, प्रसिद्ध पंतप्रधान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page