PUNE CRIME : खोट्या सह्या करून वडिलांची फसवणूक

Photo of author

By Sandhya

PUNE CRIME : खोट्या सह्या करून वडिलांची फसवणूक

वडिलांच्या मालकीच्या सदनिकेची कागदपत्रे चोरून त्यावर 1 कोटी 20 लाखांचे कर्ज काढल्याप्रकरणी मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपन मुकेश शहा (वय 34, रा. दत्तवाडी), तत्कालीन अ‍ॅक्सिस बँकेचे अधिकारी, डीएसए एजन्सीचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुकेश जयंतीलाल शहा (वय 63, रा. दत्तवाडी) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 2018 ते 25 फेब्रुवारी 2020 दरम्यान घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपन शहा हा तक्रारदार मुकेश शहा यांचा मुलगा आहे. तपनने वडिलांच्या मालकीचा असणार्‍या सदनिकेची कागदपत्रे चोरली आणि लोन मिळविण्यासाठी ही कागदपत्रे सेनापती बापट रस्त्यावर असणार्‍या अ‍ॅक्सिस बँकेत दिली.

तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीची खोटी सही करून एक कोटी 20 लाखांचे लोन घेऊन फसवणूक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे करीत आहेत.

Leave a Comment