PUNE : धायरीत तीन कंपन्यांना भिषण आग; अग्निशमन दलाच्या सतर्कतेने 40 ते 50 नागरींकांचे वाचले प्राण

Photo of author

By Sandhya

तीन कंपन्यांना भिषण आग

पुण्यातील सिंहगडरोड परिसरातील धायरी-नांदेड रस्त्यालगत बारंगाने मळा येथे असलेल्या तीन कंपन्यांना भिषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना आज 30 सप्टेंबरला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पीएमआरडीए व पुणे अग्निशमन दलाकडून सात वाहने आणि तीन वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. आगीच्या धुराचे लोट दूरवर पसरताना दिसत होते.

या धुराच्या लोटामुळे आग आटोक्यात आणणे जवानांना अवघड झाले होते. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात जवानांना यश आले. या घटनेमध्ये तिन्ही कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सादर घटना घडली त्यावेळेला बॅटरी कंपनीत दोन कामगार काम करत होते. आग लागताच दोन कामगार आणि शेजारील कंपनीतील कामगार बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

नांदेड सिटी अग्निशमन दलाचे सुजित पाटील, सिंहगड अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रभाकर उम्राटकर, भारत पोवार, संजु चव्हाण, सतिश डाकवे, श्रीनाथ जाधव, उमेश आग्रे या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाच्या सतर्कतेने 40 ते 50 नागरींकांचे वाचले प्राण आग लागलेल्या कंपनीच्या पत्र्याला लागूनच कामगार राहत असलेली मोठी चाळ आहे. यामध्ये चाळीस ते पन्नास लोक राहतात.

अग्निशमन दलाच्या जवानांनी चाळीतील सर्व लोकांना बाहेर काढुन त्यांचे घरात असलेले गॅस सिलेंडर आणि सर्व साहित्य घरा बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

Leave a Comment