पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी NCP पॅनल नाही?

Photo of author

By Sandhya

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी NCP पॅनल नाही?

पुणे  – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अद्याप अधिकृत पॅनेल जाहीर झाले नाही, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हवेली तालुक अध्यक्ष भरत झांबरे यांनी दिली.

रविवारी (दि.9) ते मार्केट यार्डात आले होते. व्यापारी गटातून दोन जागा आहेत. राष्ट्रवादीने उमेदवार निवडले आहेत का, असे त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादीकडून व्यापारी गटातून अनेक जण इच्छुक आहेत. त्यांना म्हणणे मांडण्याच्या संधीही दिल्या आहेत. मात्र, अद्याप उमेदवार निवडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment