श्रीकांत शिंदेंनी केली पत्रकारांची बोलती बंद, “ऐका, तुम्ही आधी पक्षाचे नाव नीट घ्या..”

Photo of author

By Sandhya

 गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे, मग ते एकनाथ शिंदे यांचं बंड त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणं आणि पुन्हा नव्याने शिंदे भाजप सरकार स्थापन होणं. हा सर्व क्रम पाहायला मिळाला आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.

अशा स्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासह भाजपा नेते अयोध्यानगरीत प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी गेले आहेत. शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरे गटाकडून सतत टीका केली जात आहे. अयोध्या येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे खासदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे पत्रकारावर भडकल्याचे दिसून आले.

नेमकं काय घडल? – दरम्यान, श्रीकांत शिंदे पत्रकारांशी संवाद साधत असताना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, “शिवसेनेनं अशी टीका केली आहे की, भाजपाने एकनाथ शिंदे यांना हायजॅक केलंय, भाजपाच्या पैशावर हा अयोध्येचा तमाशा सुरू आहे”, या उद्धव ठाकरे गटाकडून केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता श्रीकांत शिंदे म्हणाले, “मला वाटतं तुम्ही पक्षाचं नाव नीट घेतलं पाहिजे. आधी पक्षाचं नाव नीट घ्या, मग प्रश्न विचारा…” असे म्हणत पत्रकारावर भडकल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment