Pune : पुण्यातून पळालेल्या ISIS च्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांकडून अटक

Photo of author

By Sandhya

पुण्यातून पळालेल्या ISIS च्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांकडून अटक

काही दिवसापूर्वी पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापेमारी करत आयएसआयएस या दहशतवादी संघटनेला मदत करणाऱ्या काही दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. 

मात्र यावेळी पोलिसांच्या तावडीतून एक दहशतवाडी निसटला होता. त्याच पळालेल्या दहशहतवाद्याला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ISIS मॉड्यूल  असणाऱ्या शाहनवाज उर्फ ​​शफी उज्जामा या दहशतवाद्याला अटक केली आहे.

शाहनवाजला दिल्लीतूनच अटक करण्यात आली आहे. नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने (एनआयए) या दहशतवाद्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. हा दहशतवादी एनआयएचा मोस्ट वॉण्टेड दहशतवादी असून त्याला शाहनवाज उर्फ ​​शफी उज्जामा या नावानेही ओळखले जाते.

शाहनवाज हा पुणे इसिस प्रकरणात वॉण्टेड होता. शाहनवाज हा दिल्लीचा रहिवासी असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. तो व्यवसायाने अभियंता आहे.

दहशतवादी शाहनवाज पुणे पोलिसांच्या ताब्यातून पलायन करून दिल्लीत राहत होता. सध्या दहशतवाद्याची चौकशी सुरू आहे. वास्तविक, एनआयएने ISIS पुणे मॉड्यूल प्रकरणात 7 जणांना अटक केली होती.

यावेळी तीन दहशतवादी पळून दिल्लीत लपले होते. या तीन दहशतवाद्यांपैकी एक म्हणजे शाहनवाज उर्फ ​​शफी उज्जामा, ज्याला आज पकडण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले.

मात्र, पुणे इसिस प्रकरणात वॉन्टेड असलेले रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फयाज शेख हे दोन दहशतवादी अद्याप फरार आहेत. त्यांचाही पोलिस शोध घेत आहेत.

Leave a Comment