वाघनख्यांच्या वादात चित्रा वाघ यांची उडी ; म्हणाल्या…

Photo of author

By Sandhya

वाघनख्यांच्या वादात चित्रा वाघ यांची उडी

सध्या राज्याच्या राजकारणात वाघ नख्यांवरून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. या वादात भाजपच्या चित्रा वाघ यांनी उडी घेतली आहे. ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी वाघनख्यांवर शंका घेत ते नकली असू शकतात असे म्हटले आहे.

यावर चित्रा वाघ यांनी ‘इथल्या नकली वाघांना पोटशूळ उठला आहे’, अशी टीका ठाकरेंवर केली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी लंडनला रवाना झाले आहेत.

मात्र ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी वाघनखांवर शंका घेत, ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, छत्रपतींनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला त्यांच्या ऐतिहासिकतेविषयी शंका घेणाऱ्या त्यांच्या मर्कटलीला यातूनच आलेल्या आहेत.

पण त्या वाघनखांची धार आजही तेवढीच तीव्र आहे, जी या नकली वाघांच्या असत्याचा कोथळा बाहेर काढण्यास सक्षम आहे, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment