PUNE : सचिन हार्डवेअरला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कुटुंबाचा होरपळून मृत्यू

Photo of author

By Sandhya

सचिन हार्डवेअरला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कुटुंबाचा होरपळून मृत्यू

पिंपरी चिंचवड येथील चिखली भागातील सचिन हार्डवेअरला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण कुटुंबाचा होरपळून मृत्यू  झाल्याचे समोर येत आहे.

चिमणाराम चौधरी (वय 45) ,ज्ञानुदेवी चौधरी (वय 40) ,सचिन चौधरी (वय 10) ,भावेश चौधरी (वय 15) यांचा ह्या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. याच हार्डवेअर दुकानाच्या वरती चौधरी कुटुंब वास्तव्यास होते.

ही आग इतकी भीषण होती की यात जीव वाचवण्याची संधीही न मिळाल्याने चारही जणांचा होरपळून मृत्यू झाला. शॉटसर्किट मुळे ही आग लागली असल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.

पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. महापालिकेचे आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Leave a Comment