पुणे शहरांतर्गत (इंटरसिटी) रेल्वे सुरू करावी अशी मागणी…

Photo of author

By Sandhya

पुणे शहरांतर्गत (इंटरसिटी) रेल्वे सुरू करावी अशी मागणी

नगर येथून पुण्यात जाणार्‍या प्रवशांची अडचण दूर करण्यासाठी दौंडमार्गे नगर -पुणे शहरांतर्गत (इंटरसिटी) रेल्वे सुरू करावी अशी मागणी सेंट्रल रेल्वे झोनचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी मध्य रेल्वे झोनचे जनरल मॅनेजर नरेश ललवाणी यांच्याकडे केली आहे.

सुदर्शन डूंगरवाल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, “क्षेत्रफळाने राज्यात सर्वात मोठा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याकडे पाहिले जाते. नगर येथून अनेक प्रवासी पुण्याला दररोज ये-जा करतात. त्यात अनेक प्रवासी रेल्वेने तसेच चारचाकी वाहने, एसटी गाड्यांनी प्रवास करतात.

मिळालेल्या माहितीनुसार नगर येथून पुण्याला जाणारी व पुणे येथून नगरला येणारी सुमारे पाचशेच्या जवळपास वाहने आहेत. नगर-पुणे प्रवास करताना मात्र वाहतुक समस्या गंभीर बनली असून दोन तासाच्या प्रवासाला किमान चार तास लागत आहेत.

वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप प्रवाशांना रोजस सोसावा लागत आहे. त्यामुळे दौंडमार्गे नगर – पुणे शहरांतर्गत (इंटरसिटी) रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे. दौंडमार्गे अशी रेल्वे सेवा सुरू झाली तर प्रवाशांचा वेळ वाचेल, वाहतूक समस्येतून सुटका होईल.

शेतकर्‍यांना शेतमाल नेण्यालाही त्याचा फायदा होणार असल्याने पुणे-दौंड-अहमदनगर या शहरांतर्गत रेल्वे सुरू झाल्यास अनेकांना मोठा प्रश्न सुटेल त्यामुळे ही रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी सेंट्रल रेल्वे झोनचे सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांनी केली आहे.

Leave a Comment