राहुल गांधी : आधी तेलंगणा जिंकू नंतर आम्ही केंद्रातील मोदींचे सरकार पाडू…

Photo of author

By Sandhya

राहुल गांधी

तेलंगणमध्ये काँग्रेस पक्षाचे तुफान पाहायला मिळणार असून सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा दारुण पराभव होईल. राज्यातील जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी आहे,’’ असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. ते खम्मम जिल्ह्यातील पिनापाका येथे आयोजित सभेत बोलत होते.

राहुल म्हणाले, ‘‘ राज्यामध्ये सगळीकडे भारत राष्ट्र समितीने केलेला भ्रष्टाचार पाहायला मिळतो आहे. राज्यामध्ये लोकांचे सरकार स्थापन करणे हा काँग्रेस पक्षाचा मुख्य हेतू आहे.

येथे सत्ताबदल झाल्यानंतर आम्ही केंद्रातील मोदींचे सरकार पाडू. खुद्द मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनाही राज्यात काँग्रेसचे तुफान येणार असल्याचे ठावूक आहे.

काँग्रेसने काय केले? असा सवाल मुख्यमंत्री करतात पण त्यांना मी सांगू इच्छितो की ज्या शाळा आणि महाविद्यालयात तुम्ही शिकला आहात त्याची निर्मिती आम्ही केली आहे.

तुम्ही ज्या रस्त्यावरून प्रवास करत आहात, तो रस्ता आम्ही बांधला आहे. तेलंगणला वेगळ्या राज्याचा दर्जा देखील काँग्रेसकडून देण्यात आला. हैदराबादला आम्ही आयटी कॅपिटल केले. आताचा संघर्ष हा राजाविरुद्ध प्रजा असा आहे.

मलाईदार खाती मुख्यमंत्र्यांकडे ‘‘ सध्या ज्या खात्यामधून पैशांची कमाई होते ती सगळी खाती ही मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांच्या हातामध्ये आहेत. मद्यापासून महसुलापर्यंत सगळे काही मुख्यमंत्र्यांकडे आहे.

राज्यातील जनतेने वेगळ्या तेलंगण राज्याचे स्वप्न पाहिले होते पण आता केसीआर मात्र एकाच कुटुंबाचे भले करताना दिसतात. केसीआर यांनी लोकांचे एक लाख कोटी रुपये लुटले आहेत,’’ असे राहुल म्हणाले. ते तिघे एकच आहेत ‘‘राज्यामध्ये भारत राष्ट्र समिती (बीआरएस), भाजप आणि असदुद्दीन ओवेसी यांचा ‘एमआयएम’ हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन काम करत आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीतच ‘बीआरएस’ने केंद्रातील सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला होता. काँग्रेस ज्या ठिकाणी उमेदवार उभा करतो आहे त्या ठिकाणी ‘एमआयएम’चा उमेदवार उभा राहिलेला दिसतो,’’ असे राहुल गांधी म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page