राज ठाकरे : असे आंदोलन करा की सरकारमध्ये दहशत निर्माण झाली पाहिजे

Photo of author

By Sandhya

 राज ठाकरे

मुंबई-गोवा महामार्ग जो पर्यंत होत नाही, तो पर्यंत पनवेल ते सावंतवाडी मधील कार्यकर्त्यांनी असे आंदोलन करा की शासनाला तात्काळ रस्ता करावा लागेल.

आंदोलनाची सरकारमध्ये दहशत निर्माण झाली पाहिजे, असे आंदोलन करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पनवेल येथील मुंबई- गोवा महामार्गासाठी निर्धार मेळाव्या दरम्यान केले.

अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वामुळे देशाच्या प्रगतीला चालना : पंतप्रधान मोदी रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला वेग मिळावा आणि हे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण व्हावे यासाठी,

पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुंबई- गोवा महामार्ग निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, अमित अभ्यंकर, नितीन देसाई, अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment