धक्कादायक..! पुण्यातून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा…

Photo of author

By Sandhya

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोंढव्यात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोंढव्यातील लक्ष्मीनगर परिसरात सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली.एका मराठी वृत्तपत्राच्या वेब पोर्टलने याबाबतचे वृत्त प्रसारित केले आहे. कोंढव्यातील दोघेजण सोमवारी रात्री पाकिस्तान जिंदाबादच्या घाेषणा देत होते.

तेथून निघालेल्या काही नागिरकांनी या घोषणा ऐकल्या आणि त्याबाबतची माहिती लगेच पोलिसांना दिली. कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले. घोषणा देणारे दोघेही लक्ष्मीनगरमधील शाळेच्या बांधकामावर सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असल्याचे समजते.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक देखील करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी याच कोंढव्यातून सुरक्षा यंत्रणांनी काही दहशतवाद्यांना अटक केली होती. आता पुन्हा एकदा देशविरोधी प्रकार समोर आल्याने परिसरात या विषयाची एकच चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page