
सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ची कामगिरी चंदनाचे झाडाची चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास मुद्देमालासह केले जरेबंदसिंहगड रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं ३५/२०२५ भा. न्या.सं. कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल होता. दाखल गुन्हयाचे अनुशंगाने दि. १७/०१/२०२५ रोजी तपास पथकातील सहा पोलीस निरीक्षक, सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार केकाण, पाटील क्षिरसागर, ओलेकर, मोहीते, पांडोळे, असे सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार शिवाजी क्षिरसागर यांना त्याचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, प्रयोजिसटी समोरील कॅनोल लगत वडगाव पुणे येथे एक संशयीत इसम थांबला असुन त्याचे जवळ एक पांढ-या रंगाच्या पोत्यामध्ये चंदनाचे झाडे कापण्याची हत्यारे आहेत अशी खात्रशिर बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जावुन खात्री करुन योग्यती पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले.लागलीच स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणी करता सदर ठिकाणी एक संशयीत इसम हा त्याचे खांदयावर पांढ-या रंगाचे पोते घेवुन एका आडबाजुस थांबलेला दिसला. त्यावेळी आम्हांस त्याचा संशय आल्याने आम्ही सोबतचे स्टाफचे मदतीने त्यास आहे पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता, त्याने त्याचे नाव भरत शिवाजी जाधव वय ३४ वर्षे रा. केडगाव चौफुला गडदेवस्ती ता. दौंड जि. पुणे असे असल्याचे सांगितले, त्याचे जवळ असलेल्या पांढ-या रंगाच्या पोत्यामध्ये तो काहीतरी लपवत असल्याचा संशय आल्याने त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या पोत्याची पाहणी करता त्या मध्ये १,०००,००/- रु.किं. चे अर्धवट तोडलेले चंदनाच्या झाडाचे तुकडे मिळुन आले, त्याचे ताब्यात मिळुन आलेल्या चंदनाच्या झाडाच्या तुकड्या बाबत त्यांच्याकडे जागीच तपास करता त्याने सदरचे चंदनाचे तुकडे हे दि.१६/०१/२०२५ रोजी मानस धायरी परिसर येथुन चोरी केल्याचे सांगितल्याने त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द यवत पोलीस स्टेशन पुणे व हवेली पोलीस स्टेशन पुणे येथे देखील चोरीचे गुन्हे दाखल असुन पुढील अधिक तपास पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परी. ३. पुणे श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग श्री. अजय परमार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, अमोल पाटील, विनायक मोहीते, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल, स्वप्निल मगर, यांनी केली.