संजय राऊत : ‘आम्ही मणिपुरच्या मंदिरात गेलो तर मोदी तिथेही जातील का?’

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

महाराष्ट्र दौऱ्यात नाशिकच्या काळाराम मंदिराच्या भेटीचा समावेश नव्हता. पण उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने २२ जानेवारीला तिथे कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आता मोदींनीही तिथे कार्यक्रम ठेवला आहे असा दावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

“नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या सुरुवातीच्या योजनेत काळाराम मंदिराच्या भेटीचा समावेश नव्हता. परंतु शिवसेनेने जाहीर केल्याप्रमाणे, आम्ही २२ जानेवारीला काळाराम मंदिरात पूजा करू. म्हणून त्यांनी पंतप्रधानांच्या काळाराम मंदिराच्या भेटीचे नियोजन केले,असे राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, शिवसेना मणिपूरमधील राम मंदिराला भेट देण्याची योजना आखणार आहे त्यानुसार मोदींनी आता त्याचेही त्याचे अनुसरण करावे असा टोमणाही मारला.

ते म्हणाले, “आम्ही तिथे जाण्याची घोषणा केली आहे, म्हणून पंतप्रधान जात आहेत, म्हणून जर उद्या आम्ही मणिपूरच्या राम मंदिरात गेलो तर पंतप्रधान मोदी तिथेही जातील का असा सवाल त्यांनी केला.

पंतप्रधानांच्या हस्ते आज अटल सेतूचे उद्‌घाटन होणार आहे त्याच्या संबंधात बोलताना राऊत म्हणाले की, हे उद्‌घाटन बरेच दिवसांपासून प्रलंबित होते.

निवडणुका येईपर्यंत पंतप्रधानांना वेळ मिळत नाही.या पुलाचे काम कधीच पुर्ण झाले आहे, त्या संबंधात आम्ही हा प्रश्न वारंवार विचारला होता. जर काम पूर्ण झाले आणि पंतप्रधानांकडे वेळ नसेल, तर तुम्ही तो पुल जनतेसाठी खुले करा.

पण भाजपची भूमिका आहे की जेव्हा पंतप्रधानांकडे वेळ नसतो, तर कोणताही प्रकल्प सुरू केला जात नाही, त्यांची कोणतीही योजना लोकांसाठी नसते. असे ते म्हणाले.

Leave a Comment