संजय राऊत : “प्रभू श्रीरामाचे अपहरण केले, राम मंदिर उत्सव हा भाजपचा कार्यक्रम”

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

येत्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिराच्या उद्धघाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळयासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. देशभरात अनेकांनी दिग्गज मंडळींना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे.

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरुन शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या राजकीय नेत्यांना कोणत्याही प्रकारचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावरून भाजपवर निशाणा साधला आहे. काय म्हणाले संजय राऊत?

“संपूर्ण देशात नेत्यांना प्रश्न विचारला जातोय तुम्हाला निमंत्रण आलं का? हा भाजपचा कार्यक्रम आहे. राम मंदिर उत्सव नाही. संपूर्ण देशाला निमंत्रण द्यायचं असते. देव स्वतः त्यांच्या भक्ताला बोलवत असतो आणि भक्त जात असतात. आमचं श्रीरामाशी वेगळं नातं आहे.

मला वाटते प्रभू श्रीरामाचे अपहरण केले आहे. भाजपचा कार्यक्रम झाला की आम्ही प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जाऊ, आम्हाला आमंत्रणाची गरज नाही.

आम्ही स्वतःचा दर्शनाला जाऊ. भाजपला जे करायचं ते करू द्या.” पुढे ते म्हणाले, “भारतीय संसदेचं उद्घाटन झालं तेव्हा हाच प्रकार झाला, हे सर्व राजकीय कार्यक्रम सुरु आहेत. देशासाठी ज्यांचं काहीच योगदान नाही त्यांनी संसदेचं उद्घाटन केलं. अयोध्येसाठी त्यांचं काहीच योगदान नाही ते राम मंदिर उत्सव करत आहेत.”

यावेळी संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेबाबत देखील प्रतिक्रिया दिली. “भारत आणि सर्वांना जोडण्याचं काम राहुल गांधी यांनी पहिल्या यात्रेमध्ये केले आहे.

या देशाचे संविधान वाचवण्याचं काम करायचं आहे. त्यामुळे राहुल गांधी भारत न्याय यात्रा घेऊन यात्रा काढत आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. राहुल गांधींसोबत जनता आहे,” असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

Leave a Comment