शिंदे गटाला मोठा दिलासा; ठाकरे गटाच्या आमदाराची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Photo of author

By Sandhya

ठाकरे गटाच्या आमदाराची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आमदार निधी वाटपातील दुजाभाव प्रकरणी रवींद्र वायकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राज्यातील आमदारांच्या विकास निधी वाटपात सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप वायकर यांनी याचिकेत केला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या द्विसदस्य खंडपिठानं निर्णय दिला.

रवींद्र वायकर यांनी यांनी दाखल केलेली याचिका गुणवत्तेच्या आधारावर कमकुवत आहे. तसेच आरोपासंदर्भात ठोस पुरावे नाहीत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदार निधी वाटपात तफावत असल्याचा आरोप करणारी रिट याचिका रवींद्र वायकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेवर आज सुनावणी घेण्यात आली. 

Leave a Comment