श्रीकांत शिंदे : “मनसेच्या येण्याने महायुतीची ताकद वाढली, जागा जिंकण्यात मोठे योगदान राहील”

Photo of author

By Sandhya

श्रीकांत शिंदे

मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करून मनसैनिकांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले.

राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर गुढी पाडव्याचा मुहूर्त साधून राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राज ठाकरे यांच्या निर्णयाचे भाजपासह महायुतीतील अन्य पक्षांकडून स्वागत केले जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. यासाठी खूप खूप धन्यवाद देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने प्रभावित होऊन, गेल्या १० वर्षात पंतप्रधान मोदी यांनी ज्या प्रकारे देशात विकास केला आहे.

देशाला एक सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या समर्थनामुळे महायुतीची ताकद महाराष्ट्रात वाढली आहे. येणाऱ्या काळात महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्यात मनसेचे मोठे योगदान असेल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

देशात नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणावर विकास करत आहेत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. पाठिंबा देताना त्यांनी कुठलीही अट ठेवली नाही. आज देशात नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणावर विकास करत आहेत.

मोदींच्या नेतृत्वासाठी राज ठाकरेंनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत केले.

सस्नेह स्वागत ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे.

आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या!, असे फडणवीस यांनी म्हटले. 

Leave a Comment