सोन्याच्या दरात मोठी वाढ; ऐन लग्नसराईत

Photo of author

By Sandhya

सोन्याचे दर गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत चालले आहेत. मात्र दर वाढले असले तरी सोने खरेदीमध्ये फरक पडलेला नाही. ग्राहकांचा तितकाच प्रतिसाद सोने खरेदीला आहे. पण या वेळी सोन्याने नवीन विक्रम केला.

5 एप्रिलला सर्वाधिक सोन्याचे दर बघायला मिळाले आहेत जगातील मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. स्टॉक मार्केटची घसरण झाली आहे. त्यात रशिया युक्रेन युद्धही झालं आहे. त्यामुळे सोन्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करावी, असं पी.एन.जी ज्वेलर्सच्या सौरभ गाडगीळ यांनी सांगितलं आहे.

वर्षअखेरीस सोन्याचा दर प्रतितोळा 70 हजारांवर जाण्याचा अंदाज
सोन्याचे नवीन विक्रम केला. 61,000 इतका दर गाठला, हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक दर आहे पण भारतात आपण सोन्याकडे फक्त गुंतवणूक म्हणून बघत नाही तर ते स्त्रीधन असते. म्हणून ग्राहक अजूनही सोने खरेदीला पसंती देतात मात्र या वर्षाच्या शेवटपर्यंत दर 70,000 प्रती तोळा होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तेव्हा ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे बघणे महत्वाचे असेल.

Leave a Comment