लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचा तिसरा टप्पा आज पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली.
दरम्यान, राज्यातील सर्वात लक्षवेधी असणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात आजच मतदान होत आहे. याठिकाणी मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या लढत होत आहे.
बारामतीमधील रिमांड होम मतदार केंद्रावर सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. यामध्ये त्यांची आई प्रतिभा पवार, पती सदानंद सुळे, मुलगी रेवती यांच्यासह सर्वच कुटुंबीय मतदानासाठी उपस्थित होते.