उद्धव ठाकरे : २२ जानेवारीला काळाराम मंदिरातील कार्यक्रमाच राष्ट्रपतींना निमंत्रण

Photo of author

By Sandhya

उद्धव ठाकरे

२२ जानेवारीला नाशीकच्या काळाराम मंदिरातील कार्यक्रमाच निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात येणार आहे. सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तेव्हा राष्ट्रपतींना बोलावण्यात आले होते.

आताही काळाराम मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावी, यासाठी त्यांना निमंत्रण देत आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, २२ जानेवारीला नाशीकच्या काळाराम मंदिरात जाणार आहे. गोदातिरावर आरतीही करणार आहे. सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तेव्हा राष्ट्रपतींना बोलावण्यात आले होते.

सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते झाली होती. त्यामुळे काळाराम मंदिरातील आरतीसाठी राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी कडवट हिंदुत्वादी आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेचं योगदान सर्वांना माहित आहे. कारसेवकांच्या धाडसाशिवाय राम मंदिर झालं नसतं. ‘पहिले मंदिर फिर सरकार’ ही शिवसेनेची घोषणा होती.

२२ जानेवारीला दिवाळी साजरी करा पण दिवाळं निघालं त्यावरही चर्चा करा, असा टोला ठाकरे यांनी भाजपला लगावला. मी अयोध्येत राम जन्मबूमीची माती घेवून गेलो होतो. माझ्या मनात येईल तेव्हा मी अयोध्येला जाणार आहे, असेही ते म्हणाले.

नाव अटल सेतू पण अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटोच नाही. राम मंदिरातही रामाची मूर्ती असेल का? की दुसरीच कुणाची? असा टोला त्यांनी पंतप्रधानांना लगावला. मोदी घराणेशाहीवर बोलतात पण गद्दारांच्या घराणेशाहीवर ते बोललेच नाहीत, असेही ठाकरे म्हणाले.

Leave a Comment