निवडणुक आली की नवनवीन किस्से बघायला मिळतात. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे, शब्दांच्या फैऱ्या झाडून आरोप प्रत्यारोप करणे असाच प्रकार काही दिवसांपूर्वी चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राच्या निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये बघायला मिळाला. प्रतिभा धानोरकर आणि विजय वड्डेटीवार यांच्यामध्ये उमेदवारी चांगली रस्सीखेच झाली.
अखेर प्रतिभाताईच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. दिल्लीवरून वापस आल्यानंतर प्रतिभाताईंनी वड्डेटीवारांचे नाव घेणे टाळल्याने दोघांमधील संघर्ष वाढला. त्यामुळे वडेट्टीवार प्रतिभाताईंच्या प्रचाराला जाणार की नाही याबाबत नागरिकांमध्ये शांसकता असतानाच 5 एप्रिलच्या संकल्प सभेमध्ये वडेट्टीवार आणि प्रतिभाताई एकाच मंचावर आले.
याच सभेमध्ये विजय वड्डेटीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांना जिंकून आणण्यासाठी संकल्प करीत प्रतिभाताई तुम्ही घाबरू नका… असे सांगून त्यांना जिंकून आणण्याची ग्वाही दिल्याने सध्यातरी दोघांमध्ये असणारे मतभेद तरी तूर्तास दूर झाल्याचे पहायला मिळाले.
विदर्भातील चंद्रपूर लोकसभा वणी आर्णी मतदार क्षेत्र सध्या चांगलेच चर्चेत आहे. 2019 मध्ये मोदींची लाट असतानाही काँगेसचे एकमेव खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे प्रचंड मत्ताधिक्याने विजयी झालेत. त्यांनी भाजपाचे हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. तेव्हापासूनच हा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला आहे.
या क्षेत्राचे नेतृत्व खासदार बाळू धानोरकर करीत असतानाच अचानक त्यांचे निधन झाले. त्यामुळे काँग्रेसमध्ये ह्या जागेसाठी अंतर्गत धुसफूस सुरू झाली. ह्या जागेकरीता काँग्रेसमध्ये प्रतिभा धानोरकर यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच विजय वड्डेटीवार यांची मुलगी शिवाणी वड्डेटीवार यांनी ह्या जागेवर दावा ठोकला.
त्यामुळे प्रतिभा धानोरकर आणि शिवाणी यांच्या मध्ये रस्सीखेच सुरू झाली. काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस पहायला मिळाली. अखेर पक्षश्रेष्ठींनी प्रमिभा धानोरकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकल्याने शिवाणी वड्डेटीवार यांचा दावा निष्फळ ठरला. परंतु ह्या प्रकाराने चंद्रपूर लोकसभा मतदार संघ चांगलाच राजकीयदृष्ट्या चर्चेत आला.
वड्डेटीवार हे प्रतिभा धानोरकरांच्या प्रचाराला चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात जातील का ? असा प्रश्न लोकांच्या मनात सुरू असतानाच काँग्रेसमध्ये राजकीय दृष्ट्या चांगली घडामोड घडली. 5 एप्रिलला चंद्रपूरात काँग्रेसच्या वतीने इम्पेरियल पॅलेस बालाजी मंदिराजवळ, दाताळा येथे संकल्प सभा घेण्यात आली.
राज्याचे निरीक्षक रमेश चेनीथल्ला, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुलजी वासनिक, प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले, प्रदेश काँग्रेस अध्यक्षा पल्लवी रेनके, यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थिती लावली् त्यामुळे संकल्प सभेच्या एकाच मंचावर दोघेही विजय वड्डेटीवार आणि प्रतिभा धानोरकर आलेत.
त्यामुळे दोघांमधील असणारा राजकीय वाद अखेर तूर्तास दूर झाल्याचे दिसून आले. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी, मार्गदर्शन करताना प्रतिभा धानोरकर यांना विश्वास दिला. संकल्प सभेत विजयाचा संकल्प करीत प्रतिभाताईंना म्हणाले… तुम्ही आमच्या पक्षाच्या आमदार आहात. आता तुम्ही घाबरू नका…तुम्हीच खासदार होणार आहात.
ज्यावेळी विजय वड्डेटीवार म्हणतो त्योवळी होतातच. काँग्रसचे निरीक्षक चेनीथल्ला यांनाही विश्वास देऊन सांगितले. हम मैदान मै जितने के लिए उतरते है, हारने के लिए नही, असे सांगून प्रतिभाताई आणि कार्यकर्त्यांनी मनात कोणतेही शंका न बाळगता मी पुन्हा 9 तारखेपासून प्रचाराला येणार असल्याचे सांगून विश्वास दिला.
त्यामुळे तूर्तास तरी दोघांमधील उमेदवारीच्या जागेवरून निर्माण झालेला राजकिय वाद शमल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे प्रतिभाताईच्या प्रचारासाठी वड्डेटीवार येणार कि नाही असणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. इंडिया आघाडीचे सर्वच घटक पक्ष प्रतिभा धानोरकर यांच्या पाठीशी उभे राहिल्याने आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटविण्यास यश आल्याने भाजप आणि काँग्रेस मधील सामना अधिकच चुरशीचा होणार असल्याचे राजकीय जाणकार सांगताहेत.