विजय वडेट्टीवार : ‘मिलिंद देवरा निवडून येणे तर दूर, साधे तिकीटही मिळणार नाही’ 

Photo of author

By Sandhya

विजय वडेट्टीवार

मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे कारण आता काही महिन्यांनंतर लोकसभा निवडणुका होणार आहेत.

अशा स्थितीत सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरांसारख्या बड्या नेत्याचा पक्ष सोडल्यास काँग्रेसचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच मुंबईत सुद्धा काँग्रेसला मोठं खिंडार पडल असल्याचं चित्र दिसून येत आहे. काल मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

यावर आता काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे भाकीत करत पक्षाने सर्व काही देऊन देखील त्यांची कृती म्हणजे नैतिकता आणि नितीमत्ता संपुष्टात आणणारी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. खासदारकीच्या मोहापायी त्यांनी काँग्रेस सोडली आहे. असं वडेट्टीवार म्हणाले आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, “मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांच्या सोबत फार जून नाते आहे. पक्षाने त्यांना सर्वकाही दिले आहे.

एखाद्या वेळी केवळ खासदारकीच्या लोभापाई त्यांनी असा निर्णय घेतला आहे. हे अतिशय चुकीचे आणि दुर्दैवी आहे. मात्र मी विश्वासाने सांगतो मिलिंद देवरा हे परत खासदार होणार नाहीत. ते ज्या जागेसाठी पक्ष सोडून गेलेत, त्या दक्षिण मुंबईवर ठाकरे गटाच्या शिवसेनेची सत्ता आहे.

त्यामुळे अशा स्थितीत असा निर्णय घेणे आणि पक्षाला धोका देणे म्हणजे, अतिशय चुकीचे आहे. मी पूर्ण विश्वासाने सांगतो, ज्या जागेसाठी ते आग्रही आहेत, त्या ठिकाणाहून मिलिंद देवरा निवडून येणे तर दूर, त्यांना साधे तिकीटही मिळणार नाही’. असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

Leave a Comment