संक्रांतीपूर्वी महाराष्ट्रातील हवामान बदलते: ढगाळ वातावरण, शेतकऱ्यांसाठी चिंता वाढली

Photo of author

By Sandhya


मुंबई: पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह उपनगरातील गारठा कमी झाला आहे. शहर आणि उपनगरांमध्ये सकाळी धुके आणि दुपारी/संध्याकाळ अंशतः ढगाळ आकाश. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 डिग्री आणि 20 डिग्रीच्या आसपास असेल.

उत्तर पश्चिम भारत आणि मध्य भारतात पुढचे 24 तास कमी तापमान राहणार आहेत. 2-3 डिग्री सेल्सियस तापमानात घट होईल. पुढच्या तीन दिवसांत कमाल तापमान 4 डिग्रीने वाढेल असा अंदाज आहे. पश्चिम भारताता 24 तासात किमान तापमान 3 डिग्रीने खाली घसरेल, तर कमाल तपामान 3 डिग्रीने वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे.
महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस कोणताही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात हळूहळू कमाल तापमान वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये दाट धुक्याची चादर उशिरापर्यंत पाहायला मिळाली. राज्यात पावसाचा इशारा नसला तरी ढगाळ वातावरण असल्याने काही अंशी तापमानात वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.

श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती आहे. दुसरीकडे राजस्थानपासून वरच्या बाजूला समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढल्याने उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याची चादर आहे. महाराष्ट्रात मात्र सध्या असा कोणताही इशारा देण्यात आला नाही.

Leave a Comment