यंदा पाऊस ठोकणार रामराम; वाचा काय आहे प्रकरण

Photo of author

By Sandhya

यंदा मान्सून पाऊस सरासरीपेक्षा कमी पडेल, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून-सप्टेंबर या काळातील मान्सून सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल. हे प्रमाण ९४ टक्के असणार आहे. यामुळे देशातील अन्नधान्य उत्पादन करणाऱ्या शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

एल निनोच्या धोक्यामुळे यंदाच्या मान्सूनवर विपरित परिणाम होणार असल्याचं स्कायमेटने म्हटलं आहे. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह म्हणाले, “ट्रिपल-डिप-ला निनामुळे गेल्या सलग चार वर्षांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सामान्य किंवा सामान्यपेक्षा राहिलं.

आता ला निना संपला आहे आणि एल निनोची शक्यता वाढत असून पावसाळ्यात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे. एल निनोच्या पुनरागमनामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.”

Leave a Comment