
बारामतीत युवकावर कोयता, गज व काठ्यांनी हल्ला; मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बारामती शहरातील खंडोबानगर परिसरात किरकोळ वादातून २४ वर्षीय युवकावर कोयता, लोखंडी गज, काठ्या व दगडाने हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी नकुल गोपाळ वाल्मीकी यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, दुर्गा टॉकीज परिसरातील वाद सोडविण्याचा प्रयत्न केल्याच्या रागातून प्रशांत गोरे, आर्यन गोरे, गौरव गोरे, श्रवण गोरे आणि ऋषीकेश गुळवे यांनी रात्री उशिरा वाल्मीकी यांना घराबाहेर बोलावून मारहाण केली. या हल्ल्यात वाल्मीकी जखमी झाले असून त्यांच्यावर सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले.