Headlines

बारामतीच्या विकासकामांचा खासदार पार्थ पवार यांनी घेतला आढावा

नागरिक व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत स्वीकारली निवेदने; विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा खासदार श्री. पार्थ अजितदादा पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांची भेट घेण्यासाठी नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

खासदार श्री. पार्थ पवार यांनी उपस्थित नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी सादर केलेली विविध निवेदने स्वीकारून संबंधित प्रश्नांवर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

तसेच बारामती मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांशी संबंधित विषयांचा त्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन आढावा घेतला. संबंधित कामांना गती देण्याबरोबरच नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

दरम्यान, बारामती शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनासोबतही त्यांनी आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना खासदार श्री. पार्थ पवार यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.

नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासोबतच बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाशी समन्वय साधून काम करण्यावर खासदार पार्थ पवार यांनी यावेळी भर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *