कार्यक्षम नगरसेवक राजेंद्र नाना सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश
बारामती – बारामती नगर परिषदेच्या वाढीव हद्दवाढीतील नगरसेवकांची प्रभागातील विकास कामा संदर्भात खासदार पार्थदादा पवार यांनी बैठक आयोजित केली होती.
त्यावेळी प्रभाग क्रमांक १८ मधील सर्व सर्वसाधारण मिटींगमध्ये मंजूर केलेल्या कामांना नगराध्यक्ष सचिनशेठ सातव तसेच मुख्याधिकारी पंकज भुसे यांना सदरील कामे लवकरात लवकर चालू करणेबाबत सुचना केल्या. विकासात्मक कामांच्या अनुषंगाने मंजूर प्रलंबित रिंग रोड अंतर्गत रस्ते,मुख्य रस्त्यासह प्रभागातील ड्रेनेज लाईन,रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण रस्तेसह सिमेंट कॉक्रटीकरण रस्ते,स्ट्रीट लाईट,हायमॉस लाईट,पाण्याच्या चारीमध्ये सिमेंट वॉल कंपाऊंड करणे,मंजूर सामाजिक भवन,धार्मिक मंदिरे,विविध ठिकाणी सुशोभीकरण करणे, अण्णाभाऊ साठे नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन करणे,संपूर्ण प्रभागात वृक्षारोपण,तसेच नगर परिषदेच्या शाळा दुरुस्तीसह शालेय पोषण साहित्यासाठी जातीने लक्ष घालून कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात आले. तसेच पुर्णात्वास असलेल्या विश्वकर्मा सामाजिक भवनाचे उद्घाटन व मंजूर कामांचे भूमिपूजन करणेबाबत सकारात्मक चर्चा होवुन नगराध्यक्ष सचिनशेठ सातव तसेच संबंधित अधिकारी यांना तातडीने कामाची कार्यवाही करण्यासाठी सुचना करण्यात आल्या.
बारामती नगर परिषदेच्या विकासात्मक कामासाठी १८००/-कोटी पेक्षा निधी मंजूर करण्यात आला असून प्रभागातील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असे खासदार पार्थदादा पवार यांनी स्पष्टोक्ती दिली.
यावेळी प्रभाग क्रमांक१८मधील विकासात्मक कामांबाबत नगरसेवक श्री.राजेंद्र (नाना)सोनवणे व नगरसेविका अश्विनी सातव यांनी प्रभागातील विकासात्मक कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी स्पष्ट भुमिका मांडली त्याला खासदार पार्थदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला,यावेळी मा.नगरसेवक सुरज सातव उपस्थित होते.
नगराध्यक्ष सचिनशेठ सातव मुख्याधिकारी पंकज भुसे यांना प्रशासकीय कार्यवाही लवकरात लवकर पुर्ण करुन विकासात्मक कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सुचना व आदेश देण्यात आले.
